Just another WordPress site

वादळी खेळी करणाऱ्या सूर्याने मोडला युवीचा रेकाॅर्ड

असा रेकाॅर्ड करणारा सुर्या पहिलाच खेळाडू, पहिल्या स्थानी झेप

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- न्यूझीलंड विरूद्धच्या दुस-या टी २० सामन्यात सुर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. केवळ ४९ चेंडूत त्याने २१७ च्या स्ट्राईक रेटने झंझावाती १११ धावांची खेळी केली. या खेळीला त्याने ७ चौकार आणि ११ चौकारांचा साज चढवला. या खेळीसह त्याने भारताचा सिक्सर किंग युवराज सिंह याचा मोठा रेकॉर्ड काढला. त्याच बरोबर एक अनोखा विक्रम करणार पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ७ षटकार मारुन टी ट्वेन्टी फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम युवराज सिंहच्या नावे होता. युवीने आपल्या टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७४ षटकार ठोकले. आज सूर्याने ७ षटकार मारुन ७९ षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. सुर्यकुमारने ३२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले तर ४९ चेंडूत धमाकेदार शतकी खेळी केली. म्हणजे अर्धशतकानंतर केवळ १७ चेंडूत त्याने पुढील ५० धावा काढल्या. आपल्या डावाच्या शेवटच्या १९ चेंडूत त्याने ६१ धावा कुटल्या. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचं आव्हान ठेवले होते. पण ते न्युझीलंडला पेलवले नाही आणि भारताने मालिकेतला पहिला विजय साकार केला.

GIF Advt

गेल्या काही दिवसांपासून तुफान फार्मात असलेल्या सुर्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. सूर्याने या संधीचं अक्षरश: सोनं करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढली आहेत. भारताचे सलामीवीर अपयशी ठरले होते. पण सुर्यकुमारने तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!