Latest Marathi News
Ganesh J GIF

भररस्त्यात स्टेअरिंग सोडून चालकाचा पत्नीसोबत रोमान्स

सोशल मीडियावर 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

माधोपूर दि १२(प्रतिनिधी)- अलीकडे प्रसिद्धीसाठी काही लोक रस्त्यावर सुद्धा अश्लील चाळे करताना दिसत आहेत. बाईकवर नको ते चाळे करतानाचे कपलचे व्हिडीओ याआधी व्हायरल झाले होते. पण आता बहाद्दर कपलनी थेट चार चाकीवर अश्लील चाळे केले आहेत. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

सोशल मिडीयात व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजस्थान मधील, सवाई माधोपूर मधील आहे.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिल बनवण्यासाठी चालकाने हातातलं स्टेअरिंग सोडून दिलेलं आहे आणि पत्नीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, कधी तो पत्नीशी चाळे करत आहे, तर कधी आपले दोन्ही पाय तिच्या सीटवर टाकून बसत आहे. विशेष म्हणजे चालकाने यासाठी अॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टमचा वापर केला आहे. दुर्घटना कमी करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होत असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत.

 

इन्स्टाग्रामवर अफसर घुड़ासी afsar_ghudasi44 या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवरुन अनेकांनी खडे बोल सुनावले आहेत. राजस्थानामधील सवाई माधोपूर पोलिसांनीही या व्हिडीओची दखल घेतली आहे. एका युजरने आपल्याकडे पुढारलेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असून मस्करी सुरु आहे असा संताप व्यक्त केला आहे. तर एका युजरने चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!