Latest Marathi News
Ganesh J GIF

विराटने संपवला शतकाचा दुष्काळ अन तोडला सचिनचा रेकाॅर्ड

'रनमशीन' विराट कोहलीचे तीन रेकाॅर्ड, दिग्गज सचिन लाराला पछाडत मोठा विक्रम

अहमदाबाद दि १२(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने २४० चेंडूत शानदार शतक ठोकले आहे.त्याचे हे कारकीर्दीतील ७५ वे शतक आहे. कसोटीमध्ये हे त्याचे २८ वे शतक आहे. या शतकानंतर त्याने नवा विक्रम करत सचिन तेंडुलकर व ब्रायन लाराचा विक्रम मोडला आहे.

स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नाबाद अर्धशतक झळकावले आणि डावात घरच्या मैदानावर ४००० धावा पूर्ण करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याचबरोबर विराटने शतक झळकावून टेस्ट क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यासाठी कोहलीला तब्बल १२०६ दिवसांची वाट पाहावी लागली. त्याने कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध झळकावले होते. त्याचबरोबर विराटने काराचा एक विक्रम तोडला आहे.विराट ब्रायन लारा याला मागे टाकत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. लाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ हजार ७१४ धावा केल्या होत्या. विरटाने ५९ धावा करताच विरटाने तो विक्रम तोडला. महत्वाचे म्हणजे आजचे शतक विराटचे कारकीर्दीतील ७५ वे शतक होते. विराट कोहलीने ७५ आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी ५५२ इनिंग्ज खेळल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने ५६६ इनिंग्ज खेळल्या आहेत. विराटने सचिन तेंडुलकरचा हा विक्रिम मोडला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत आता रंगत आली आहे. कारण भारताला टेस्ट चॅम्पीयनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी ही कसोटी जिंकणे गरजेचे आहे. पण सामन्याचा चाैथा दिवस सुरु असून कसोटी अनिर्णीत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या कसोटी सामन्यात अनेक विक्रम नोंदवले जात आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!