Just another WordPress site

महिला आयोगाच्या अध्यक्षांचा वडिलांवरच लैंगिक शोषणाचा आरोप पण…

त्या ट्विटनंतर नेटकरी महिला आयोगाच्या अध्यक्षांवर संतापले, बघा काय घडले

दिल्ली दि १२(प्रतिनिधी)- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नुकतेच त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ते मला मारहाण करायचे. मी त्यांच्यापासून वाचण्यासाठी पलंगाखाली लपायचे, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे. पण आता नेटीझन्स स्वाती मालीवालांवर संतापले आहेत.

एका कार्यक्रमादरम्यान मालीवाल यांनी सांगितले की, मला अजूनही माझ्या वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचे आठवते. माझे वडील घरी आल्यावर मी खूप घाबरायचे. मी भीतीने अनेक रात्र पलंगाखाली घालवल्या. मी नेहमी घाबरलेली असायची. त्यावेळी माझ्या मनात विचार यायचा की अशा माणसांना धडा शिकवण्यासाठी काय करायला हवे. त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या वडिलांना खूप राग यायचा. ते कधी कधी माझे केस पकडून भिंतीवर आदळायचे. यावेळी रक्तही वाहायचे आणि खूप वेदनाही व्हायच्या. वडीलांवर असा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, मालीवाल यांचं एक जुनं ट्वीट चर्चेत आलं आहे. हे ट्वीट पाहून नेटीझन्स मालीवाल यांच्यावर संतापले आहेत. कारणया आरोपांनंतर त्यांचं एक जुनं ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, त्यांचे वडील एक सैनिक आहेत.मी एका सैनिकाची मुलगी आहे. मी देखील त्याच वातावरण वाढले आहे. देशासाठी काम करणं आणि देशासाठी मरणं हेच मी शिकले आहे. जगातली कोणतीही ताकद मला घाबरवू शकत नाही. असे ट्विट मालिवाल यांनी २०१६ साली केले होते. पण आता ७ वर्षानंतर यु टर्न घेत मालिवाल यांनी वडिलांवरच लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रखर श्रीवास्तव यांनी हे ट्विट केले आहे. यामुळे स्वाती आता नेटिझन्सच्या निशान्यावर आहेत. दरम्यान स्वाती मालीवाल यांनी त्यांना या आघातातून बाहेर पडण्याचे श्रेय त्यांची आई, काकू, आजोबा आणि आजीला दिले होते.

GIF Advt

स्वाती मालीवाल आता दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख आहेत.अलीकडेच अभिनेत्री, राजकारणी बनलेल्या भाजपाच्या खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य बनले आहेत. त्यांनी वयाच्या ८ व्यावर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा अनुभव सांगितला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!