Latest Marathi News
Ganesh J GIF

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचे शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष?

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल, बघा रस्त्यावर काय घडले?

जामखेड दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या कार्यशैलीमुळे कायम चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी केलेली वक्तव्ये कायमच चर्चेत असतात. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेकदा मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मात्र, ह्याच रोहित पवार यांनी त्यांच्याकडे निवदेन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा ते जुनी वाकी या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेक समस्या येत आहेत. यासाठी परिसरातील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार यांच्याकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. शुक्रवारी पवार खर्डा जुनी वाकी भागाच्या दाै-यावर होते. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच ग्रामस्थ निवेदन घेऊन त्यांना भेटायला गेले. रोहित पवार हे खर्डा येथे येताच शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडवले आणि आंदोलन सुरु केले. पवार गाडीतून खाली उतरतील आणि त्यांचा प्रस्ताव स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. मात्र रोहित पवार गाडीतून उतरले आणि रस्त्यावर बसून ठिय्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करत, दुसऱ्या गाडीत बसून पुढच्या प्रवासाला निघून गेले. काही लोकांनी त्यांना आवाज दिला, पण पवार यांनी त्यांची दखलच घेतली नाही. या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मतदारसंघात एकच चर्चा सुरू होती. यामागचे नक्की कारण काय? अशी चर्चा झडत आहे.

दरम्यान रात्री उशिरा पवार पुन्हा त्या गावात गेले अन् त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. आणि आपली चूक सुधारली. बारामतीतून येत जामखेड मधील लोकांना आपलेसे करणारे रोहित पवार अचानक असे का वागले याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!