सभेत टिका टाळली पण ठाकरेंचा रामदास कदमांना ‘असाही’ धक्का
रामदास कदमांचे बंधू ठाकरेंच्या गोटात, कदम यांच्या घरातील फुटीने अडचणीत
खेड दि ६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या विराट सभेत ठाकरे यांनी शिंदे,भाजपावर तर आसूड ओढलाच पण रामदास कदम यांच्याबद्दल एक अक्षरही न बोलता जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंची ही खेळी रामदास कदम यांच्या अडचणी वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे खेडमध्ये आल्यानंतर त्यांचा सदानंद कदम यांच्या कुटुंबियांकडून सत्कार करण्यात आला. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधू आहेत. रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये ही भेट घेण्यात आली. त्यानंतर कदम कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. एकंदरीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली असली तरी रामदास कदम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ठाकरेंचा सत्कार आपण ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. हा रामदास कदम यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण यातुन कदम कुटुंबातील फूट समोर आली आहे. ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदम यांनी ठाकरेंवर टिका केली होती. पण आता सदानंद कदम यांच्या भुमिकेमुळे कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खेड मधील सभेत अनेक नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर टिका केली. पण उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर प्रत्यक्ष टीका करणं टाळले. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना रामदास कदम यांचं नावही घेतलं नाही. पण सदानंद सुळे यांची भेट घेत धक्का मात्र दिला आहे.
शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या नाही, तर माझ्या वडिलांनी केली. हा सत्तेचा गुलाम झालेला चुना लाव आयोग आहे. भुरटे, गद्दार आणि तोतयांना सांगतोस नाव चोराल, पण शिवसेना चोरू शकत नाही. भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं. ज्यांनी सोबत दिली, त्यांना संपवायला निघाले आहेत. मात्र, त्यांनी प्रयत्न करुन बघावेत, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी खेडमधील सञेतड दिले आहे.