Latest Marathi News

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसमोर मनसेच्या संदीप देशपांडेंचे आव्हान

२०२४ ला ठाकरेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी मनसेचा उमेदवार ठरला, लढत रंगणार

मुंबई दि १९(प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेमध्ये आता मनसेने आपली पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. कारण २०१९ ला ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देणारा मनसे यावेळेस मात्र लढत देणार आहे.

विधानसभेच्या  २०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे नेते आणि उमेदवार आदित्य ठाकरे हे मोठ्या फरकाच्या मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेने आपला उमेदवार न देता  एकप्रकारे  आदित्य ठाकरे यांना ही निवडणूक सोपी करून टाकली होती. परंतु आगामी २०२४ च्या निवडणुकीत मनसे हे ठाकरे गटाला आणि पर्यायाने आदित्य ठाकरे यांना शह देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. कारण कारण मनसे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे वरळीतून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. देशपांडे हे दादर-माहीम विधानसभेतील माजी नगरसेवक असले तरीही आगामी विधानसभेची मजबूत बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे वरळीची जबाबदारी  सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संदीप देशपांडे यांनी नुकताच वरळीतल्या बीडीडी पुनर्विकासातील रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी शेकडो रहिवासी उपस्थित होते. त्यामुळे वरळीची बांधणी करत एकप्रकारे मनसे ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा गड  भेदण्यात देशपांडे यशस्वी ठरतात का? हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल. पण त्याआधी मुंबई महापालिकेची परिक्षा आहे.

देशपांडे यांना वरळीत पाठवून पक्षाचे नेते नितिन सरदेसाई व पक्षाचे उपाध्यक्ष व विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांच्यावर दादर- माहिम विधानसभेच्या बांधणीची जबाबदारी आणखी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण नगरसेवक निवडूकीत पराभूत झालेले देशपांडे ठाकरेंना आव्हान देणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!