Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकसभेसाठी सुप्रिया सुळें विरोधात भाजपाकडून विजय शिवतारे मैदानात

बारामतीचा दाैरा करत शिवतारेंनी पवारांना डिवचले, अजित पवारांचा हिशोब पूर्ण करणार

बारामती दि १९ (प्रतिनिधी)- पवारांचा बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, सुप्रिया सुळे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी नवनव्या रणनीती आखल्या जात आहेत. पण आता जवळपास सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी भाजप शिंदे गटाचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे.

शिवतारेंना बारामतीमधून उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपा आणि शिंदे गटात त्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा विशेष जोर आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांची फौज बारामतीत तळ ठोकून आहे. दर सहा महिन्यागणिक सर्व्हे केले जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माजी मंत्री राम शिंदे यासारख्या नेत्यांवर बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे. सुरूवातीला बारामती मधून भाजपाचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर होते. पण आता एकनाथ शिंदेच्या बंडानंतर समीकरणे बदलली आहेत. शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवतारे यांची पुणे जिल्ह्यावरील पकड पाहता ते सुळे यांना तुल्यबळ लढत देऊ शकतील, असा विश्वास आहे. नुकताच शिवतारे यांनी बारामतीचा दाैरा करत पवारांना आव्हान दिले आहे. शिवाय वेळोवेळी लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. शिवतारे यांनीही मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा उपनेता आणि संपर्कनेता आहे. शिवसेना वाढीचे काम मुख्यमंत्र्यांनी सोपवलं आहे. ते दिवसरात्र एक करून करणार आहे. केंद्र व राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत नेणार आणि जनतेमध्ये शिवसेनेची ताकद वाढविणार, असे सांगत लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे विजय शिवतारे यांचे तिकिट जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यापैकी चार मतदारसंघांत महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे पारडे जड आहे. मागच्यावेळी अजित पवार यांच्याशी पंगा घेतल्यामुळे त्यांचा पराभव झाला. मात्र, आता तशी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शिवतारे विरूद्ध सुळे लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!