
शिंदे गटातील या खासदाराचे नाव एैकताच संजय राऊत थुंकले
राऊतांचा थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल, शिंदे गटातील हा नेता राऊतांच्या निशान्यावर
मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून संजय राऊत आणि शिंदे गटात कायमच जोरदार शाब्दिक चकमक पहायला मिळते. प्रत्येक मुद्द्यावर राऊत कायम शिवसेना स्टाईलने टिका करत असतात. शिंदे गटाकडुनही त्याला उत्तर दिले जाते. सरकारच्या विविध धोरणांवर आणि योजनांवर राऊत टीका करत असतात. आता तर शिंदे गटातील खासदारांचा उल्लेख करताच राऊत थुंकल्याचा प्रकार घडला आहे.
उद्धव ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील अशी टिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती.या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेवढ्यात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतले. श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. त्यामुळे पत्रकारांनी हा विषय टाकत राऊत यांना पुढचा प्रश्न विचारला. यापूर्वी राऊत संजय सिरसाट यांच्यावरील प्रश्नासंदर्भात थुंकले होते. सध्या त्यांच्या थुंकण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. शिंदे गटाकडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल असे विधान केल्याने शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. “ठाकरेंना इथली उष्णता सहन होत नसेल म्हणून ते परदेशात गेले असतील. ज्यांच्या नावावर राजकारण केलं, मतं मागितली त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तरी ते येणार आहेत का? पण ज्याठिकाणी ते गेले आहेत तिथल्या राज्याचा नुकताच राज्याभिषेक झाला आहे, त्यांना तरी भेटायला जावू नये अशी खोचक टिका श्रीकांत शिंदे यांनी केली होती.
लोकसभा आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. कोणालाही चिंता वाटायचं कारण नाही. असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिंदेंचे सिंहासन लवकरच हलणार असुन हे सरकार लवकरच सत्तेत पायउतार होईल असा दावा देखील राऊत यांनी केला आहे.