मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगत राऊत ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते.
संजय राऊत ट्विट करत ईडीच्या कारवाईवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तीन ट्विट करत शिवसेना सोडणार नाही.. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असे राऊत यांनी म्हटले आहे.
पत्राचाळ प्रकरणी अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. मात्र, जरवेळेस वेगवेगळी कारणे देत संजय राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. संजय राऊत सद्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. त्यांचे वकील साबणेही त्यांच्या ‘मैत्री’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ईडीने दोनदा संजय राऊत यांना समन्स बाजवले होते.राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर भाजप आणि शिंदेगटाकडून राऊत यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.