Just another WordPress site

बिबवेवाडीत पोलीसांनी ‘या’ ठिकाणी केली मोठी कारवाई

तब्बल ९४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पुणे शहरातील बिबवेवाडीत लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या आठ जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी लाॅटरी दुकानाचे मालक, कामगारांसह एकून ९४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

GIF Advt

बिबवेवाडी ‌भागात ऑनलाइन लाॅटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. जुगार खेळणाऱ्यांना ‘आओ चलो खिलाडी, खेल शुरू है बिबवेवाडी’ असे संदेश सोशल मिडीयावर पाठवत आकर्षित करण्यात आले होते. पोलीसांनी केलेल्या कारवाईत ८४ हजार ९३० रुपये, ३२ मोबाइल संच, २७ दुचाकी वाहने असा १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर जुगार खेळात सामील असणाऱ्या ९४ जणांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील आठवड्यातच सामाजिक सुरक्षा विभागाने महापालिका ‌भवनसमोर ऑनलाइन लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकत कारवाई केली होती.
बिबवेवाडीतील कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक,उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर, श्रीधर खडके, अविनाश लोहोटे, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे, राजेंद्र कुमावत, प्रमोद मोहिते, अण्णा माने, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!