Latest Marathi News
Ganesh J GIF

संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

 'या' तारखेपर्यंत संजय राऊत यांची कोठडी वाढवली

मुुंबई दि ४ (प््रतिनिधी)- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना धक्का देणारा निर्णय न्यायालयाने सुनावला आहे.

संजय साऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर करण्यात आले होते.कोर्टात संजय राऊत यांनी आपल्याला ह्रद्याचा त्रास असताना देखील व्हेंटिलेशन नसलेल्या खोलीत ठेवल्याचा आरोप करत आपण गुन्हा कबूल करावा यासाठी धमकावण्यात येत असल्याचा आरोप केला होता. ईडीने सर्व आरोप फेटाळत लावत राऊत चाैकशीत सहकार्य करत नसल्यामुळे कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ईडीची मागणी मान्य करत राऊत यांची कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यासोबतच राऊत यांना हवा असणाऱ्या खोलीत ठेवण्यात यावेत असे आदेश दिले आहेत.

पत्राचाळ प्रकरणात आलेल्या रकमेतून संजय राऊत यांनी अलिबाग येथे १.१७ कोटी रुपये रोख देऊन जमीन घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आता सोमवारी पुढली सुनावणी होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!