Just another WordPress site

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात यांचा होणार समावेश

मंत्रिमंडळात दोन्हीकडून नवीन चेह-यांना संधी

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपकडून नऊ, तर शिंदे गटाकडून सात जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपाकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून यावर अंतिम निर्णय आला नसतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.मंत्रिमंडळात भाजपाकडून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, महाजन, विखे, दरेकर ही नावं आधीपासूनच निश्चित मानली जात होती. मात्र रवी राणा, नितेश राणे या दोघांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.ज्या भागात शिवसेनेची ताकद कमी आहे, तिथल्या शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद देण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे. पण भाजपाकडून एैनवेळी वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आहे.

 

भाजपाचे संभाव्य मंत्री?

चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
प्रवीण दरेकर
रवींद्र चव्हाण
बबनराव लोणीकर
नितेश राणे
रवी राणा

शिंदे गटाचे संभाव्य मंत्री

दादा भुसे
उदय सामंत
दीपक केसरकर
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार
संजय शिरसाट
बच्चू कडू

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!