
ओैरंगाबाद दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाटांना यांचे मंत्रिपद हुकले. यानंतर शिरसाट नाराज असल्याची चर्चा रंगली. पण आता संजय शिरसाट नाराज असल्याची पुष्टी करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.यात त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली आहे.
ओैरंगाबाद मधील एका कार्यक्रमात संजय शिरसाट म्हणाले की, “मी अतुल सावेंच्या वडिलांसोबत काम केलं आहे. त्यांच्या वडिलांसोबत काम करताना अतुल सावे राजकारणात येतील असं मला कधी वाटलं नव्हतं. परंतु राजकारणात आला काय, मंत्री झाला काय राज्यमंत्री झाला काय, कॅबिनेट मंत्री झाला काय, सगळंच झालंय.अरे आमच्याकडेही पाहत जा. सध्या ज्येष्ठतेचं कुठं काही राहिलंच नाही असं वाटायला लागलं आहे” अस म्हणत आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याचे दुख व्यक्त करताना अतुल सावे यांना टोला लगावला.त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारातही नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिरसाट यांनी ठामपणे शिंदेना पाठिंबा दिला होता. अगदी त्यांच्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटोही काढला. पण मंत्रिपदात डावलल्यानंतर ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून ट्विट देखील केले होते. त्यामुळे शिरसाट यांनी मंत्रिपद मिळणार का न मिळाल्यास कोणती भुमिका घेणार हे पहाने महत्त्वाचे ठरणार आहे.