Just another WordPress site

महिला सक्षमीकरणासाठी निर्भया पथकाचे काम काैतुकास्पद

खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भया पथकाशी साधला संवाद

इंदापूर दि २१(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे या भिगवण दाै-यावर असताना महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या निर्भया पथकाशी संवाद साधला.यावेळी निर्भया पथक कशाप्रकारे काम करतो त्यांच्याशी संपर्क कसा करायचा याबद्दल माहिती घेतली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनीही सविस्तर माहिती देत महिलांना सुरक्षित वाटावा असे वातावरण निर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे आवर्जुन सांगितले.

भिगवणमधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींबरोबर शिक्षकानेच अमानवी कृत्य केल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत त्या शिक्षकाला निलंबित केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनीही जिल्हा परिषद शाळेला भेट देत या घटनेची माहिती घेतली. यावेळेस त्यांनी निर्भया पथकाबरोबर संवाद साधला. निर्भया पथक कशाप्रकारे काम करते याची माहिती त्यांनी घेतली. यावेळी पोलीस अधिकारी सुर्वे, पवार तसेच निर्भया पथकातील एस एस जाधव. अमृता गुट्टे, प्रिया पोमण यांनी यावेळी पथक करत असलेल्या कामाची माहिती दिली. मुलींना सक्षम बनवणे, मुलांमध्ये महिला आणि मुलींविषयी आदराची भावना निर्माण करणे आणि मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे हा निर्भया पथकाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी पथकाकडून शाळा किंवा महाविद्यालय परिसरात साध्या वेशात गस्त घालत पाहणी केली जाते. तसेच मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर देखील पथकाकडून कारवाई केली जाते.याचबरोबर प्रत्येक शाळेत जात प्रबोधन करण्याबरोबरच आजच्या काळात वाढत असलेल्या सायबर क्राईमची देखील माहिती दिली जाते. जेणेकरून त्याला त्या बळी पडू नयेत याची खबरदारी घेतली जाते.त्याचबरोबर विवाहित महिलांच्या तक्रारीची दखल घेत त्यांना न्याय देण्याचे काम पथकाकडून केले जाते.
निर्भया पथक प्रत्येक शाळेत तक्रार पेटीची अभिनव संकल्पना राबवत आहे. जर एखादी मुलगी समोर येण्यासाठी घाबरत असेल तर ती तिची समस्या तक्रार पेटीच्या माध्यमातून सांगू शकते. फरकाकडे ती तक्रार आल्यानंतर ते त्याची सोडवणूक करतात. प्रत्येक शाळेत निर्भया पथकाची माहिती फलकाद्वारे दिली आहे

GIF Advt

जेणेकरून त्यांच्याशी संपर्क साधता यावा. तसेच ११२ या नंबरवरती संपर्क साधल्यास संबंधित ठिकाणी तात्काळ मदत पाठवण्याचे काम निर्भया पथक करत असते. यावेळी महिलांविषयी आदराची भावना निर्माण करण्याचे काम आपल्या घरातूनच होणे गरजेचे आहे. महिलांचा सन्मान करण्याची शिकवण प्रत्येक घरातून दिली गेली तर नक्कीच महिलांसाठी भयमुक्त समाज निर्माण होईल असे आवाहन देखील निर्भया पथकाने यावेळी केले.

यावेळी सुळे यांनी निर्भया पथकाच्या कामाचे काैतुक करताना पोलिसांची आदरयुक्त भीती असलीच पाहिजे तसेच प्रत्येक महिलेला पोलीस स्टेशन माहेर वाटल पाहिजे अशी भावना व्यक्त केली.महाराष्ट्राचे पोलीस हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत त्यांचा मला सार्थ अभिमान आहे अशा शब्दात पोलीसांच्या कामाची स्तुती केली. यावेळी नागरिकांनीही पोलीसांचे आलेले सुखद अनुभव सांगत पोलिसांचे आभार मानले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!