ओ वाचवा! ड्रायव्हर त्रास देतोय! किडनॅप करतोय
पीएमटी बसमध्ये प्रवासाचा आरडाओरडा, बघा नक्की प्रकार काय?
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. असाच एका पुणेकराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. बस चालक उतरू देत नसल्याने प्रवाशाने वाचवा चालक मला किडनॅप करतोय अशी बोंब ठोकत पीएमटी बसमध्ये चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. हा प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पीएमटीच्या चिंचवड ते बालेवाडी बसमध्ये हा प्रकार घडला आहे. पीएमटीषी बस चिंचवडहून बालेवाडीला जात होती. दोन स्टॉपच्या मध्येच एका प्रवाशाने ड्रायव्हरला दरवाजा उघडण्यास सांगितलं. त्यावर बसचा दरवाजा केवळ स्टॉपवरच उघडेलच असे उत्तर ड्रायव्हरने दिले. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी शिवीगाळ देखील करण्यात आली.पण अचानकच प्रवाशाने . ‘ओ वाचवा, ड्रायव्हर त्रास देतोय. उतरु देत नाही. ड्रायव्हर किडनॅप करतोय,’असे ओरडत बसच्या डॅशबोर्डवर हात मारू लागला.यावेळी बसमधील इतर प्रवाशांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं. मात्र तो कोणाचेच न एैकता ओरडत राहिला.त्यामुळे रस्त्यावरचे लोक नक्की काय झालयं हे पाहण्यासाठी बसजवळ जमले.पण ड्रायव्हरने
बस सुरु केली ती थेट स्टॉपवरच थांबवली.त्यामुळे प्रवासाचा आरडाओरडा बिनकामाचा ठरला. हा सगळा प्रकार काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकाॅर्ड केला.तो आता व्हायरल होत आहे.

याबाबत पी एम पी एम एल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले,की पिंपरी चिंचवड परिसरात इलेक्ट्रिक बसमध्ये ही घटना घडली आहे. या संदर्भातील माहिती आम्ही घेत आहोत मात्र प्रवाशांनी अशा प्रकारे गैरवर्तन करून इतर प्रवाशांना त्रास होईल असे वागू नये. चालकाबाबत तक्रार असल्यास पीएमपीच्या टोल फ्री क्रमांक वर तक्रार करावी असे आवाहन केले आहे.