पोरापेक्षा पोरी जिगरबाज! आशिया चषकावर भारताचा झेंडा
आशिया चषकावर महिला संघाचा 'इतक्यावेळा' विजय, लंकेचा चारली धुळ
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- भारताच्या महिला क्रिकेट संघाने नवीन इतिहास घडवत आशिया चषकसवर आपले नाव कोरले आहे. रोहित धर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अपयश आले होते,पण हमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने कमाल करून दाखवली आहे. भारताने श्रीलंकेचा पराभव करुन विजेतेपद मिळवले.

आशिया कप जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. २०१८ चा अपवाद वगळता भारतानेच ही स्पर्धा जिंकली आहे. महत्वाचे म्हणजे २०१८ मध्ये अंतिम सामन्यात भारताचा बांगलादेशने पराभव केला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची दाणादाण उडाली. २० षटकात त्यांना फक्त ६५ धावाच करता आल्या. श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. भारताकडून रेणुका सिंगने ३ षटकात ५ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
विजयासाठी फक्त ६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारतीय संघाला दोन विकेट गमावत पूर्ण केले. शेफाली वर्मा ५ धावांवर बाद झाली तर जेमिमा रॉड्रिग्ज फक्त २ धावा करून माघारी परतली.स्मृती मानधनाने ४७ धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ धावांची खेळी केली. स्मृतीने षटकार मारत आशिया चषकावर भारताचे नाव कोरले.
भारताने जिंकलेल्या ७ आशिया चषकापैकी पाच वेळा श्रीलंकेचा तर दोन वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे.बांगलादेश कडून मात्र भारताला पराभव पत्कारावा लागला होता. आता भारताचा पुरूष संघ विश्वचषकात कमाल दाखवतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.