Latest Marathi News
Ganesh J GIF

भीतीदायक! पुण्यात बिबट्याने केली पाळीव कुत्र्याची शिकार

घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद, नागरिक भीतीच्या सावटात

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावात बिबटयाने घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला असून पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुणे जिल्ह्यातील हिंजवडी जवळ असलेल्या नेरे गावात शिंदे वस्तीमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या दारात बिबट्या आला. त्याने या शेतकऱ्याच्या दारात झोपलेल्या त्याच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच हे सीसीटीव्ही फुटेज व्हीडीओ रुपात सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. घराच्या दरवाजात एक पाळीव कुत्रा झोपला आहे. घराचा दरवाजा बंद आहे. कुत्राही गाढ झोपला आहे. इतक्यात बिबट्या प्रवेश करताना दिसतो. दबा धरुन बसलेला बिबट्या अगदी हळूवारपणे, कुत्र्याच्या जवळ येतो. आणि काही कळायच्या आत बिबट्या त्याच्यावर झडप घालतो. कुत्रा, काहीसा प्रतिकार करायचा आणि भुकण्याचा प्रयत्न करतो. पण, तोवर खूपच उशीर झालेला असतो. मागच्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य वाढू लागले आहे. रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनेची दखल घेऊन तरी पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

उसाची तोड झाल्याने बिबट्या वाडीवस्तीवर, लोकवस्तीत घुसत आहे. नेरे, जांबे, कासारसाई या गावांतील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे. शहरी भागात बिबट्याचा दर्शन होऊ लागल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. दरम्यान परिसरात बिबट्याची दहशत वाढू लागली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!