
शाळकरी विद्यार्थिनींची एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी
मुलींच्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, कारण अस्पष्ट, बघ्यांची मोठी गर्दी
नाशिक दि १५(प्रतिनिधी)- नाशिक शहरात सातपूर परिसरातील एका विद्यालयातील शाळकरी विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. मुलींच्या दोन गटात सुरु झालेले भांडण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. याची चर्चा होत आहे.
दहावीच्या पेपरदिवशी हा प्रकार घडला आहे. सातपूर भागातील एका विद्यालयात दहावीचा पेपर सुरु होता. पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले असताना भर रस्त्यात काही विद्यार्थिनींनी एका विद्यार्थिनीला मारत होत्या. अगदी परीक्षेच्या पॅडने देखील मुलीला मारण्यात आले. तर काहींनी झिंज्या धरत मारहाण केली. ही विद्यार्थिनींची हाणामारी चक्क शाळेच्या आवारातच चालू होती. मुलींच्या फ्रीस्टाईल हाणामारी वेळी बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. मार खाणारी मुलगी दुसऱ्या ग्रुपची आहे. दोन गटात वाद असल्याने मुलीला मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान हा व्हिडिओ शहरात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
नाशिकमध्ये अशा प्रकारे महाविद्यालयीन तरुणींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचे समोर आले होते. त्याचे व्हिडिओ देखील जोरात व्हायरल झाले होते. नाशिक रोड परिसरातील एका महाविद्यालया बाहेरील देखील दोन मुलींच्या वादाचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत होता.