Latest Marathi News
Ganesh J GIF

या तारखेला होणार शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार

महामंडळाचेही वाटप होणार, मंत्रीपदाची अनेकांना आस, शिंदे गटात इच्छुकांची गर्दी

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशन संपल्यानंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ५ आॅगस्टला जाहीर झाला होता त्यानंतर मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तार सतत लांबणीवर पडत आहे. अखेर शिंदे आणि फडणवीसांना विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.यावेळी त्यांच्यात राज्यातील दुस-या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. त्यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास हिरवा कंदील दर्शविला होता. पण नंतर कर्नाटक बरोबर सीमावादा उफाळून आल्यामुळे तो लांबणीवर पडला होता. पण आता अधिवेशनाचीही सांगता होणार आहे. त्यामुळे जानेवारीत राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी राज्यमंत्रीही त्यांना दिलेल्या जिल्ह्यात झेंडावंदन करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महामंडळाचेही वाटप होणार असल्याची चर्चा आहे. पण कोणाला किती मंत्रिपदे आणि महामंडळे मिळणार याचा फाॅर्म्युला मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटात झुकते माप कोणाला मिळणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे. शिंदे गट आणि भाजपाकडुन मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहे. तर महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासारख्या आमदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांचं हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागलेले आहे. तर भाजपाकडुनही नितेश राणे, रवी राणा यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या केवळ कॅबिनेट मंत्रीच आहेत,येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे.त्यामुळे अनेक आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागलेले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!