नागपूर दि ३०(प्रतिनिधी)- “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. असे म्हणत अजित पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणता स्वराज्य रक्षक म्हणा असे प्रतिपादन केले आहे.
अजित पवार म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण पूर्णपणे राजकीय होते. तुम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केलं आहे, यातून बाहेर पडलं पाहीजे. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी ही संस्कृती पाळली. त्यामुळं शिंदेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहीजे. आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. परंतु काही लोक त्यांना धर्मवीर म्हणतात. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरून राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होतं. मी तर नेहमी म्हणतो आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करावा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सिन्नर दाै-यावरुन देखील अजित पवार यांनी शिंदे यांना लक्ष्य केले.
महापुरुषांचा अपमान होणार नाही यासाठी मंत्र्यांची हकालपट्टी करा, राज्यपाल हटवा या मुद्द्यांवर न बोलता दुसरे विषय आणून मुळ प्रश्नाला बगल दिली. एकनाथ शिंदे शिवसेना फोडून बाहेर आले,पण याच्याबाहेर शिंदे अद्याप आले नाही. जे व्यक्ती सभागृहात नाहीत त्यावर ते आपल मत व्यक्त करतात. असे म्हणत पवार यांनी शिंदेच्या भाषणावर नापसंती व्यक्त केली आहे.