Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे सरकारची दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

या आमदारांना मंत्रीपदाची लाॅटरी, नाराज आमदारांना गुवाहाटीची मात्रा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती आहे. येत्या १२ किंवा १३ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या रुसव्या फुगव्यामुळे मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ता प्रलंबित होता. या मंत्रिमंडळ विस्तारात आगामी निवडणूका लक्षात घेऊन अनेक अनपेक्षित आमदारांना मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारामध्ये एकूण २३ मंत्र्यांच्या समावेश होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटात ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. आमदार संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा यांना मंत्रिपद मिळण्याती शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाठ आणि भरत गोगावले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील हे तीनही नेते मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. शिंदे गटातील काही आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन नाराजी होती. गुवाहाटी दाै-यावेळी ती दुर करण्यात आल्याची माहिती आहे. अर्थात दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नाही, असंही शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते. शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती ती खरी ठरली आहे.

मंत्रिमंडळात सर्व कॅबिनेट मंत्री असुन राज्यमंत्री पदाच्या जागा रिक्त आहेत. शिंदे सरकार सत्तेवर येऊन पाच महिने उलटून गेल्यानंतर देखील पूर्ण मंत्रिमंडळ तयार झालेले नाही. यावरून विरोधकांनी अनेकदा टिका देखील केलेली आहे. पहिला मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनच्या अगोदर करण्यात आला होता. त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनच्या आधी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे पहावे लागले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!