बाॅलीवूडमधील या अभिनेत्रीच्या या अभिनेत्यावर गंभीर आरोप
अभिनेत्रीवरही केली टिका, त्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा केला दावा, म्हणाली ती मनोरूग्ण...
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये अभिनेते किंवा अभिनेत्रीतील वाद नवीन नाहीत. सध्या अभिनयापासून दुर असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीबरोबर पत्रकार परिषद घेत राखी सावंत आणि नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यावेळी तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
तनुश्री दत्ताने राखी सावंतवर मोठा आरोप केला आहे. राखीने जर माझे व्हिडीओ व्हायरल केले नसते तर २०१८ मध्येच माझे लग्न झालं असते. असा दावा केला आहे. तसेच राखी सावंत अभिनेत्री नाही, बऱ्याच काळापूर्वी तिने २-३ गाणी केली होती. ती ऑफ स्क्रीन सगळा अभिनय करते. पडद्यावर तिने लोकांनी लक्षात ठेवावं असं काम केलेलं नाही. राखी मनोरुग्ण आणि लबाड आहे. माझ्या चारित्र्याबद्दल ती काही बोलली ते सर्व काही खोटे होते. मोठ्या हुद्द्यावर असलेले गुंडांसारखे लोक राखी सावंतसारख्या २-४ जणांना पोसतात. कोणाशीही वाद झाला की ते राखीला फोन करणार, थोडे पैसे देणार मग ही बोलायला सुरू करणार. राखीचं हेच काम आहे. ती पैशांसाठी हे सगळं करते.” असा दावा तनुश्रीने केला आहे. यावेळी तिने नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यावर आरोप केले ती म्हणाली, नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री सारख्या लोकांचा आता माझ्याशी काहीच संबंध नाही. आपण या लोकांबद्दल का बोलायला हवं? त्यांच्याबद्दल बोलून मला प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज आहे. असे म्हणत तिने त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचवेळी “ज्या लोकांनी तिचे करियर संपवले. ते आजही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. असे म्हणत तिने नाराजी व्यक्त केली. दरम्यान राखीमुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप तनुश्रीनेवकेला. यावेळी तीने मीटुबद्दल बोलताना नाना पाटेकरांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. एकंदरीत मागील अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल खान यांच्यात वाद सुरु आहेत. आता या वादात तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे.
तनुश्री दत्त सध्या अभिनय क्षेत्रापासून दुर आहे. तरी सुद्धा, ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील चांगल्या प्रमाणात आहे. ती शेवटची मोठ्या पडद्यावर २०१० साली दिसली होती. तिच्या आरोपामुळे पुन्हा जुन्या प्रकरणाची चर्चा होण्याची शक्यता आहे.