Latest Marathi News
Ganesh J GIF

फोटो काढायला आलेल्या मुलीसोबत फोटोग्राफरचे लाजीरवाने कृत्य

अक्कलकोट तालुक्यात धक्कादायक प्रकार, जाब विचारताच विनवणीचे नाटक, आरोपी जेरबंद

अक्कलकोट दि ११(प्रतिनिधी)- शाळेच्या ओळखपत्रसाठी लागणारा फोटो काढण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचे कपडे उतरवून तिच्या शरीराला फोटोग्राफरने स्पर्ष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटोग्राफरवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लायक अली नदाफ असे अटक करण्यात आलेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील एका गावात ही मुलगी सकाळी आठ वाजता फोटो स्टुडिओत गेली होती. त्यावेळी तेथे स्टुडिओचा मालक नदाफ एकटाच होता. कपडे काढून फोटो घे, असे म्हणत त्याने मुलीच्या अंगावरील कपडे काढले. मुलीने याला विरोध केला. त्यानंतर त्याने मुलील्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. मुलीने या सगळ्या गोष्टीला विरोध केल्यानंतर हा प्रकार घरात कुणालाही सांगू नकोस, अन्यथा तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. घरी आल्यानंतर मुलीने या प्रकाराची तिच्या आईला माहिती दिली. आईने स्टुडिओत जाऊन नदाफ याला जाब विचारला. त्यानंतर तो विनवणी करू लागला. ही बातमी समजताच गावकऱ्यांनी आरोपी नदाफला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

आई जाब विचारत असताना माझ्याकडून चूक झाली, माफ करा, यापुढे असे करणार नाही, असे त्याने पीडित मुलीच्या आईला सांगितले. पण आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!