ठरल एकदाच! अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रीपदे?
पवार गटाला मंत्रीपदाचे वाटप निश्चित, मंत्रिमंडळ विस्तार मात्र लटकला, शिंदे गटाचा विरोध भाजपाने झुगारला?
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी दूर होण्याचे नाव घेत नाही. त्यातच पवार गटाकडून चांगल्या खात्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे पवार गटाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्री मंडळ विस्तार केला जाणार आहे.
अजित पवार गटाचा शपथविधी होऊन आठवडा झाल्यानंतर अजूनही खातेवाटप झालेले नाही. ते अजूनही बिनखात्याचे मंत्री आहेत. काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात तीन तास चर्चा झाली. यावेळी पवार गटाला कोणती मंत्रीपदे मिळणार यावर चर्चा झाली. गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांच्यासह आलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा शपथविधी झाला. पण शिंदे भाजपाचे आमदार अजून प्रतीक्षेत आहेत. अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटातील आमदारांची आहे. पण भाजप त्यांचा विरोध झुगारून अजित पवार यांना अर्थखाते देणार आहे. अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आणि नंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मोठी खाती सांभाळलेली आहेत. त्यामुळे त्यांना साजेसे मंत्रिपद मिळावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे आधी खातेवाटपाबाबत चर्चा केली जाईल आणि नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असा तोडगा काढला जाणार आहे सध्या मंत्रिमंडळात २९ मंत्री आहेत.तर १४ खाती रिक्त आहेत. यात शिंदे गट आणि भाजपाला प्रत्येकी ५ आणि अजित पवार गटाला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे संभाव्य खातेवाटप
अजित पवार – अर्थ व वित्त
दिलीप वळसे पाटील- सहकार मंत्री
धनंजय मुंडे – सांस्कृतिक विभाग
अदिती तटकरे- महिला व बालविकास मंत्री
हसन मुश्रीफ – वस्त्र उद्योग
छगन भुजबळ – अन्न व पुरवठा
संजय बनसोडे – क्रीडा
अनिल पाटील – पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम – आदिवासी