Just another WordPress site

‘शिवसेनेचे आमदार फुटणार हे शरद पवारांना माहीत होते’

अजित पवारांचा मोठा गाैप्यस्फोट, उद्धव ठाकरेंची ती चुकही सांगितली

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत घरोबा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. पण शिवसेनेतील आमदारांच्या बंडाची कल्पना शरद पवारांना आधीच होती असा गाैप्यस्फोट अजित पवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

GIF Advt

शिवसेनेच्या फुटीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होते. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती. आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनी फोन करुन दिली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकत चूक केल्याने हे बंड झाल्याचे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं. पण ते बोलले की मी बोलन एकनाथ शिंदेंशी. तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे असा खुलासा पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांनी विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करत भाजपावर टिका केली आहे.हा निकाल भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारा असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कसबा आणि चिंचवडची कोणता पक्ष लढवणार हे आम्ही एकत्र बैठक घेऊन ठरवू असे म्हणत निवडणूक होणारच असे स्पष्ट करत भाजपाला आव्हान दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!