Just another WordPress site

सलूनमध्ये केस कापायला गेला अन् जीवाला मुकला

विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, एकदा बघाच

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मृत्यू ही काही सांगून येणारी गोष्ट नाही. अगदी अपेक्षित नसलेल्या ठिकाणी सुद्धा तो येऊ शकतो. आजचे जग धावपळीचे आहे. या धावपळीच्या जगात अनेक अपघात होत असतात, ज्यात अनेकांना आपले जीव गमावावे लागतात. पण सध्या एक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत याचाच प्रत्यय येत आहे. या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.

एका सलुनच्या दुकानात नेहमीची रेलचेल असताना एक व्यक्ती सलूनमध्ये बसून आपल्या नंबरची वाट पाहत बसलेली होती. त्याच दरम्यान त्या सलूनचा मालक एका ग्राहकाचे केस कापत होता. सगळ काही साधारण असताना अचानक एक वेगवान कार सलूनमध्ये शिरते आणि काही तिथे बसलेल्या लोकांना उडवून दिले. हा सगळा प्रकार काही सेकंदात घडला. गाडी घुसल्यानंतर काही ग्राहक पटकन मागे सरकले.पण बेंचवर बसलेल्या ग्राहकाला हालचाल करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आणि गाडीने थेट त्याला धडक दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

GIF Advt

सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडिओंचा खजिना आहे. हा व्हिडिओ इथे कधी व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. याचेच उदाहरण असणारा हा व्हिडिओ @ViciousVideosने ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला हजारोच्या संख्येने व्हिव्ज मिळाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!