श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल
भाजपाच्या या नेत्याची शरद पवारांवर वादग्रस्त टिका, अजित पवार सुळेंवरही निशाना
बारामती दि ६ (प्रतिनिधी)- श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल. लोकांनी खूप सहन केलं आहे. ते राष्ट्राध्यक्ष पळून गेले, तुम्ही तर साधे खासदार आहात, अशी घणाघाती टिका भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
केंद्राने लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केली. त्या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणार सुद्धा नाही आहे, भाजपाचा खासदार कसा दिल्लीला गेला? जेव्हापासून सितारमण यांचा दौरा निश्चित झाला, तेव्हापासून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता आराम करा, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.बारामतीत परिवर्तन करायची वेळ आली आहे. बारामती हा बालेकिल्ला नसून, शरद पवारांची एक टेकडी आहे. दोन वर्ष मी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण पोलीस, प्रांत, तहसिलदार यांच्यावर चालते. माझ्यावर केसेस दाखल केल्या. समाजकारण, राजकारणात काम करताना केसेस दाखल होतात. केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा. अजित पवारांनी बंड केलं, तेव्हा २ आमदार सुद्धा आमदार मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या मागे ५० आमदार राहिले, असा टोमणा पडळकर यांनी अजित पवारांना मारला आहे.
पाकिस्तानची मॅच जिंकल्यावर हात वरून शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांना आरती करताना व्हिडिओ टाकावे लागत आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे यश असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. आजच्या मेळाव्यातील उत्साह बघितला तर पवार अस्वस्थ होतील, असेही पडळकर यांनी म्हटले.