Just another WordPress site

भाजपाची मुंबई महानगरपालिका निवडणुक शिंदे गटाच्या साथीने

शिंदे गट मनसेच्या युतीला फडणवीसांचा ब्रेक,सन्मान होणार का?

मुंबई दि ६ (प्रतिनिधी) – येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे .केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौ-यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली आहे.

GIF Advt

खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असून तेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे . भाजप आणि शिवसेना ओरीजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिका भगवा फडकवू असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केला आहे .भाजपचा मिशन इंडिया आहे .भाजपचा मिशन महाराष्ट्र आहे.बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे .म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रामध्ये आहे .असं लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची आहे. असेही फडणवीस म्हणाले आहेत. पण भाजपाने मिशन १५० ठेवल्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार त्यांचा योग्य सन्मान होणार का शिवसेनेचे चिन्ह कोणाला मिळणार की नव्या चिन्हाभोवती निवडणूक लढवली जाणार याबद्दल अजून कोणताही खुलासा झालेला नाही.

राज्यात एकनात शिंदे आणि देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतुत्वाखाली नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत .त्यात त्यांना यश मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!