Latest Marathi News
Ganesh J GIF

शीतल म्हात्रे ‘व्हायरल व्हिडिओ’प्रकरणी ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत

पाच आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, विधानसभेत जोरदार गदारोळ

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा माॅर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना अटक केली आहे. दुर्गे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते.या रॅलीतील एक व्हिडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता. ‘मातोश्री’नावाच्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यानंतर ठाकरे व शिंदे गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. विधानसभेतही याचे पडसाद उमटले होते. म्हात्रे यांनी देखील यामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला होता.आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मार्फ करणाऱ्या मुख्य आरोपीच्या शोध घेण्यासाठी दहिसर पोलिसांनी फेसबुक कंपनीला देखील पत्र पाठवले होते. पोलीसांनी मातोश्री पेज चालवणाऱ्या विनायक डायरेला अटक केली आहे.रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हिडिओ व्हायरल करायला दिला असल्याचा संशय आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र  म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. आतापर्यंत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी शिंदे व ठाकरे गटात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.या व्हिडिओवरुन शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे हा व्हिडिओ प्रसिद्धीसाठी शिंदे गटानेच व्हायरल केल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे. यावरून राजकारण रंगले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!