या मुलीने केले चक्क भगवान श्रीकृष्णाबरोबर लग्न
लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, अनोख्या लग्नाची गजब चर्चा
ओरैय्या दि १३(प्रतिनिधी)- कृष्णाच्या हजारो पत्नी असल्याचा उल्लेख आहे. पण आता उत्तर प्रदेशमधील एका मुलीने थेट कृष्णासोबतच लग्न केले आहे. एम. ए. एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या रक्षाने कृष्णासोबत लग्न केल्याने चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका मुलीचे भगवान श्रीकृष्णाशी लग्न केले आहे. या लग्नात मंत्रोच्चार आणि सप्तपदीही करण्यात आल्या. पूर्ण रितीरिवाजाने पार पडलेल्या या लग्नात कुटुंबातील सर्व सदस्यही सहभागी झाले होते. रक्षा एमएचे शिक्षण घेतल्यानंतर एलएलबी करत होती. त्याचबरोबर ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होती, तर दुसरीकडे तिचे आई-वडील लग्नाची चर्चा करत होते. पण रक्षाची लहानपणापासूनच कृष्णावर नितांत श्रद्धा होती. मला लग्न करायचं तर कृष्णाशीच असा निश्चय तीने केला होता. एके दिवशी रक्षाने सांगितले की, तिच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले आहे. स्वप्नातच देवाला आपला पती मानून तिने त्यांना हार घातला.तेव्हापासून कृष्ण हेच माझे पती असल्याचा तिने निर्धार केला. मुलीच्या या हट्टापुढे आई-वडिलांनीही अखेर हार मानली.आणि त्यांनी लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करत कृष्णाला आपला जावाई करुन घेतले. ११ मार्चला हे लग्न पार पडले.आता भगवान श्रीकृष्ण आमचे जावई बनून घरात विराजमान होतील, आम्ही खुश आहोत, अशी प्रतिक्रिया रक्षाच्या कुटुंबियांनी दिली आहे.आता रक्षा खूप आनंदी आहे कारण तिला भगवान कृष्णाच्या रूपात वर मिळाला आहे.

उत्तर प्रदेशात सध्या या लग्नाची जोरदार चर्चा आहे.रक्षाच्या मोठ्या बहिणीनेही यावरून समाधान व्यक्त केलंय. आता मथुरेशी आमचं नवं नातं तयार झाल्याचं ती म्हणाली आहे. कृष्णासोबत रक्षा एकनिष्ठ होती. मध्यंतरी राजस्थानमधील एका मुलीने कृष्णासोबत लग्न केले होते.