Just another WordPress site

‘या’ सवयीमुळे झाला सख्ख्या भाऊ पक्का वैरी

पुण्यातील लहान भाऊ या सवयीमुळे जीवाला मुकला

पुणे दि १८ (प्रतिनिधी) – सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीचा प्रत्यय येणारी घटना पुण्यात घडली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील माउली निवास येथे ही घटना घडली आहे.

GIF Advt

तेजस यशवंत भोसले असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकाश यशवंत भोसले याला अटक केली आहे. आई सुनीता यशवंत भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश आणि तेजस हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तेजस हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिल्यानंतर तो लोकांना शिवीगाळ करायचा. त्यामुळे त्याचा भाऊ आकाश हा त्याच्यापासून वेगळा राहत होता. घटनेच्या रात्री तेजस दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर तो घरातील लोकांना तो शिवीगाळ करू लागला तसेच त्याने मारहाणही केली.ही गोष्ट आईने आकाशला दिली. त्यामुळे आकाश तिथे गेल्यावर त्याच्यात आणि तेजसमध्ये वाद झाला. यावेळी आकाशने तेजसला मारहाण करून रागाच्या भरात त्याचा गळा दाबून ढकलून दिले. यातच तेजसचा मृत्यू झाला. पण सकाळी तेजसला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल केले असता त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

कोंढवा पोलीसांनी भावाचा खून केल्याप्रकरणी आकाश यशवंत भोसले याला अटक केली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत. पण दारूच्या वाईट सवयीमुळे एका भावाला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!