Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर स्वतःच्या मिशा काढणार?

ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा थेट सवाल, राष्ट्रवादीचीही मिशी वादात उडी

हिंगोली दि १(प्रतिनिधी)- राज्यातील बाजार समितींचे निकाल जाहीर झाले. हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीचांही निकाल काल समोर आले. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेला कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. पण यामुळे बांगर अडचणीत आले आहेत.

आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन चॅलेंज दिले होते. “या पॅनेलच्या १७ पैकी १७ जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आमदार संतोष बांगर म्हणाले होते. पण या बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी ‘प्रिय लाडक्या संतोष दादुड्या “मुछ” कधी काढतोय मग? असा सवाल विचारला आहे. पाैळ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत बांगर यांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या “दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. दोन दिवसांपूर्वी तो माझ्यासमोर म्हणाला की १७ पैकी १७ जागांचं पॅनल निवडून नाही आणलं, तर मी माझी मिशी काढतो. संतोष दादुड्या, कधी काढतोयस मिशी? नक्की काढ”, असे अयोध्या पौळ म्हणाल्या आहेत. याआधीही ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे.

आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीने १२ जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावरून जयंत पाटील यांनीही बांगर यांना जोरदार टोला लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!