Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसर पोलीस संघाने जिंकला लोकशाही चषक

'लोकशाही'साठी एकवटले चार स्तंभ, अटीतटीच्या लढतीत डाॅक्टर संघाचा पराभव

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर तर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “लोकशाही चषक २०२३” पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकशाहीच्या प्रमुख चार स्तंभाचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये पोलिस क्रिकेट संघ हडपसर, डॉक्टर क्रिकेट संघ हडपसर, पत्रकार क्रिकेट संघ हडपसर आणि विधी महाविद्यालय विद्यार्थी संघ यांनी सहभाग नोंदविला. लोकशाही क्रिकेट चषकाचे उद्घाटन हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, विधी महाविद्यालय प्राचार्या डॉ. रंजना पाटील, आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे, जेष्ठ पत्रकार विलास जाधव, यांच्या हस्ते झाले.
संपूर्ण सामने एका दिवसात साखळी पद्धतीने पी. जी. क्रिकेट मैदान शेवाळवाडी याठिकाणी पार पडले. अंतिम सामना हा ‘हडपसर पोलिस संघ’ विरुद्ध ‘हडपसर डॉक्टर संघ’ या दोन्ही संघामध्ये झाला. अटीतटीच्या झालेल्या या लढती मध्ये ‘हडपसर पोलिस संघ’ लोकशाही चषक 2023 चा मानकरी ठरला. लोकशाहीच्या प्रमुख स्तंभानी एकत्रित येऊन आपसात एक चांगले वातावरण निर्माण व्हावे त्याच बरोबर दैनंदिन कामकाजातून थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशाने विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपुर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुणे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व विधी महाविद्यालय प्राचार्या डॉ.रंजना पाटील यांच्या हस्ते पार पडला.

लोकशाही चषक २०२३ च्या सामन्यांमध्ये मालिकावीर पुरस्काराने डॉक्टर संघाचे डॉ.विनोद कांबिरे, अंतिम सामन्यामध्ये सामनावीर पोलिस संघाचे बाळू भिसे, उत्कृष्ठ फलंदाज डॉ विनोद कांबिरे, उत्कृष्ट गोलंदाज पोलिस संघाचे उमेश शेलार तसेच उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणुन पोलिस संघाचे समीर पांडुळे यांना गौरविण्यात आले.

 

लोकशाही क्रिकेट चषकाच्या यशस्वी आयोजनासाठी विधी महाविद्यालय संघाचे कर्णधार सुहास कानगुडे, अमित किन्ड्रे, डॉ.रविन्द्र इंगळे, आशिष देवकर, केतन पवार, अमर पाटील, मीरा बोराडे, छाया रहाणे, पायल जाधव, प्रमोद डोकनिया, उल्हास खामकर, वैभव भोर, लक्ष्मण बचाटे, आशुतोष कोलते, सुफीयान शेख, सार्थक जगताप, अक्षय पाठक, राज काटे, शुभम शितोळे, रूषभ जगताप, उदय मिरकले, मनिषा ढवळे, अभि शिंदे, कमलेश कांबळे, हेमंत ढमढेरे, खंडू गायकवाड आदींनी त्याचबरोबर हडपसर पोलिस चौकीचे अधिकारी दिनेश शिंदे, डॉ. शंतनू जगदाळे, पत्रकार अनिल मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!