शिवसेना आणि शिंदे गटाच्या नेत्याचा एकत्र विमान प्रवास
एकमेकांवर सडकून टिका पण हसत एकत्र विमान प्रवासही
मुंबई दि ५ (प्रतिनिधी) -एकमेकांनावर तुटून पडणारे ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यामधून आता विस्तवही जात नाही. पण औरंगाबाद ते मुंबई विमानात याच नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे एकाच विमानाने मुंबईला आले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. कोण जास्त गर्दी जमवतो, यावरून दोन्ही गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. यासाठी दोन्ही नेते एकमेकांवर अक्षरशः तुटुन पडत आहेत. मध्यंतरी संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यातही नेहमीच वादाची ठिगणी पडत असते. मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन माणसे आणली जातात असा आरोप दानवेंनी केला होता. तर भुमरेही अधूनमधून दानवेंवर शाब्दिक आरोप करत असतात.आजच्या विमान प्रवासात ‘सामना कुणाला वाचायची गरज आहे? यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संवाद रंगला होता. सामना तुम्हाला आणि आम्हाला वाचण्याची आवश्यकता आहे असा विनोद संदीपान भुमरे यांनी केला. त्यावर अंबादास दानवेंनी हसत दाद दिली आहे.
आज मुंबईमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला पोहचले आहे. तर काहीजण पोहोचणार आहेत. आता जरी त्यांनी एकत्र प्रवास केला असला तरीही दसरा मेळाव्यात मात्र एकमेकांवर सडकून टिका केली जाणार आहे.