Just another WordPress site

दसरा मेळाव्यात २ खासदार, ५ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटातील 'या' खासदाराचा धक्कादायक दावा, उद्धव ठाकरेंना धक्का?

नागपूर दि ५(प्रतिनिधी)- आपलाच दसरा मेळावा दणक्यात व्हावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. दोन्ही गटाचे नेते मुंबईत कळायला सुरुवात झाली आहे. त्यातच शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आजच्या दसरा मेळाव्यात दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

GIF Advt

शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमानेयांनी केला आहे. कृपाल तुमाने हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी कृपाल तुमाने हा दावा केला आहे.ते म्हणाले “दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.प्रवेश करणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार हा मुंबईचा असू शकतो. तर दुसरा खासदार हा मराठवाड्यातील असू शकतो असे म्हटल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. मराठवाड्यात सधगया ठाकरेंकडे दोनच खासदार आहेत. जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी वारंवार जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा शिंदे गटात जाणार म्हणून झाली, तेव्हा तेव्हा त्याचे खंडन करत ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे कोण प्रवेश करणार हे पहावे लागेल.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदेंच्या बंडाला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात बळ मिळाले होते. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून सहापैकी पाच आमदार हे शिंदे गटात गेले होते. पण खासदार तुमने यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.तसेच उत्सुकताही वाढली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!