Latest Marathi News

‘५० खोके घ्या पण आमच्या सोयाबीनला भाव द्या’

शेतकऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओची राज्यात चर्चा, शिंदे गटाला लगावला टोला

बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंड केल्यापासून ५० खोके हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना अनेकवेळा ५० खोके म्हणून हिणवण्यात आले आहे. आता तर शेतकऱ्यांनीही ५० खोकेच्या घोषणा देत सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

तुम्ही ५० खोके घ्या किंवा १०० घ्या, मात्र आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या…अशी मागणी शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करताना केली आहे. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर गावातील शेतकरी मधुकर वाघमारे, दिनकर वाघमारे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये ते सोयाबीनची काढणी करत असताना राजकीय नेत्यांना धारेवर धरत टोमणे मारले आहेत. तुम्ही ५० खोके घ्या किंवा १०० खोके घ्या, मात्र आम्हा शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमीभाव द्या, अशी मागणी ते सरकारला करत आहेत. सध्या सोयाबीन काढणीची लगबग सुरू आहे, पण त्याचवेळी तेलाचे भाव उतरू लागले आहेत. हे सर्व सोयाबीनला दर मिळू नये म्हणून केलेला डाव असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सध्या राज्यात “५० खोके एकदम ओके”ची जोरदार चर्चा सुरू आहे. बंडखोर आमदारांनी ५० खोके घेऊन गद्दारी केला असा आरोप शिवसेनेकडुन केला जात आहे, तर ५० खोके घेतले नाहीत असा दावा बंडखोर आमदार करत आहेत. पण आता शेतकरीही ‘या’ आमदारांवर निशाना साधत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!