Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवाजीराव आढळराव पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार?

राजकीय समीकरणे बदलल्यामुळे ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेची साथ सोडणार, या मतदारसंघातून लढणार निवडणुक?

पुणे दि १७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. तर काहीजण तिकीट आपल्याला मिळेल का? याची चाचपणी करत आहेत. तर मतांचे गणित जमवताना काहीजण पक्ष बदल करण्याचीही शक्यता आहे. कारण तीन पक्ष सत्तेत आल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे सुरूवातीला उद्धव ठाकरे गटात होते. पण ठाकरे यांनी त्यांना शिरूर एैवजी पुणे लोकसभा मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यानंतर अनेक वाद विवाद झाल्याने त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेना साथ दिली. यामागे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे गणित होते. कारण भाजपासोबत जागा वाटपात शिरूरची जागा शिवसेनेला मिळेल अशी शक्यता होती. पण आता सत्तेत अजित पवार सामील झाल्याने आणि सध्या या जागेवर राष्ट्रवादीचा खासदार असल्याने अजित पवार या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय सोय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील आणि शिरूर लोकसभा लढवतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कारण मध्यंतरी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण मध्ये एका कार्यक्रमात कसे लढायचे, कुठून लढायचे असे म्हणत आपल्या मनात सुरु असलेल्या घालमेल जाहीर केली होती. त्यावेळेसच आढळराव पाटील शिंदे गटाच्या कुंपणावर असल्याचे संकेत दिले होते. पण आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप भेटू शकलेली नाही. महत्वाचे म्हणजे आढळराव पाटील यांनी अलीकडे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे भेटीगाठी वाढवल्या होत्या. पण शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणुक लढवण्याची शक्यता असल्याने आढळराव पाटील यांना वेटिंगवर देखील ठेवले जाऊ शकते. त्यामुळे आढळराव कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून याआधी शिवसेनेकडून तीन वेळा विजय मिळवला होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच महाविकास आघाडी झाल्याने त्यांची राजकीय गोची झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!