Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मी स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’

छगन भुजबळ यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलकी टिका, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला विरोध, ओबीसी समाज आक्रमक

जालना दि १७(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत सरकारची कोंडी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी करत जालन्यात ओबीसी समाजाने एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी समाजाचा अंबडमध्ये एल्गार मेळावा पार पडला या मेळाव्यात राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते एकत्र आले होते. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टिका केली होती. आज छगन भुजबळ यांनी आपल्या शैलीत जरांगे पाटील यांचा शेलक्या शब्दात समाचार घेत जोरदार टिका केली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. असे म्हणत जरांगे पाटील यांनी आजवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ज्या गोरगरिब मराठ्याने त्यांना मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन त्यांनी पैसा कमावला, म्हणून त्यांच्यावर धाड पडली. २ वर्ष जेलमधून बेसन खाऊन आलात आणि आम्हाला शिकवता- पैसे कुठून आले? त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज द्यावी, असं जरांगे पाटील म्हणाले होते. त्याला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. तसेच ओबीसी आरक्षण घटनेनुसार आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. ओबीसीत सर्व जाती कायद्याने आल्या. तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मात्र मराठा समाज अवैधरीत्या ओबीसी समाजात घुसतो आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.त्याचबरोबर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या दबावाला बळी पडू नये व ओबीसींच्या आरक्षणात आणखी वाटेकरी निर्माण करू नयेत, असा इशाराही यावेळी भुजबळ म्हणाले आहेत. यावेळी जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याचे सत्य बाहेर आले असते तर आज परिस्थिती वेगळी असली असती असेही भुजबळ म्हणाले आहेत. लाठीमार झाल्यानंतर जरांगे घरात पडून राहिले होते. राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी जरांगे पाटलांना उपोषणस्थळी आणलं. शरद पवारांनी रुग्णालयाला भेट दिली. पण लाठीमार का झाला यामागचं सत्य कुणी त्यांनाही सांगितलं नाही. जालन्यात पोलिसांचा लाठीमार झाला. ७० पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढे पोलीस पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना? पाचवी शिकला की नाही माहीत नाही आणि ह्याला न्यायमूर्ती सर, सर म्हणतायत. खूप बोललास तू माझ्याबद्दल. पण याद राख, माझ्या शेपटावर पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस असे म्हणत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मराठा समाजाला कोणते लाभ मिळतात याची यादीच भुजबळ यांनी वाचून दाखवली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी देखील छगन भुजबळ यांना पाठिंबा देत मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव घेता जोरदार टिका केली. ओबीसी समाज काय मराठा समाजाचा शत्रू नाही. मात्र ओबीसी समाजावर अन्याय केल्यास मराराष्ट्र पेटून उठेल. असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. दरम्यान मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाल्याने राज्यातील शिंदे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!