Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! बाळाला उकळत्या दुधाने घातली आंघोळ

थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी संतप्त, डिजिटल इंडीयाचे भीषण वास्तव

लखनऊ दि २८(प्रतिनिधी) – एकीकडे भारत आधुनिक होत डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहत असताना, समाजातील अंधश्रद्धा अजूनही संपली नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. एकीकडे आपण चंद्रावर गेली असलो तरीही बुरसटलेले विचार आणि नको त्या चालीरीती, अघोरी प्रथा या अजूनही समाजात असल्याचे दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेला एका व्हिडिओ याचीच जाणीव करुन देत आहे.

लहानग्या बाळाला उकळत्या दुधाने आंघोळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील श्रवणपूर गावातील ही भयंकर घटना असल्याचे सांगितले जात आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्तीने बाळाला आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो बाळाला आपल्या पायांवर बसवतो आणि उकळते दुध त्या बाळाच्या अंगाला लावत आहे. दूध ज्या भांड्यात होते त्या भांड्यातून वाफा येत होत्या एवढे ते दुध तापले होते. दुध बाळाला लावले जात होते, तेंव्हा ते रडत असूनही तो व्यक्ती दुध लावणे थांबवत नाही. किंवा त्याला तिथला एकही व्यक्ती थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. हा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

बाळासोबत हे धक्कादायक कृत्य करताना दिसलेला साधू हा वाराणसीतील पुजारी आहे. हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला, यामागील कारण काय याची माहिती मिळू शकलेली नाही. पण एका कोवळ्या जीवासोबत असा जीवघेणा प्रकार झाल्याबद्दल सोशल मिडीयावर संताप व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!