मुंबईत दारु पिऊन महिलेचा धक्कादायक राडा
घटनेचा व्हिडीओ व्हायरल, पोलीसांच्या भूमिकेवर नागरिकांची नाराजी
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मुंबईतील मीरा रोड परिसरातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. दारू प्यायलेली एक महिला भररस्त्यात कपडे काढताना दिसत आहे. हा सगळा धिंगाणा सुरु असताना आजुबाजूला अनेकजण उपस्थित होते. सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.
मुंबईतील गजबजलेल्या परिसरात गैरप्रकार वाढताना दिसत आहेत. सध्या एक महिला दारु पिऊन अश्लील कृत्य करत आहे. ट्विटरवर दिवाकर शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. इतका भयानक प्रकार घडत असताना पोलीस कुठे होते ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला पॅन्ट उतरवता उतरवता शिव्यांची लाखोली वाहतानाही दिसत आहे. हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणच्या लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.
#DENUDE_being_DRUNK: What went wrong with the policing in #MiraRoad? Hundreds of residents have to witness such chaos of #sozzled customers of a lounge almost every night. Here, apparently, a woman high on booze opened dictionary of abuses after stripping down her pant on road!! pic.twitter.com/NsjnKAuuGl
— Diwakar Sharma 🦅 (@DiwakarSharmaa) December 16, 2022
मुंबईत अलीकडे महिलांच्या गैरकृत्याच्या घटना सतत वाढत आहे. त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. मध्यंतरी एक महिलेने भररस्त्यात बैठक मारत धिंगाना घातला होता.