Just another WordPress site

पुणे जिल्ह्यातील या गावात विद्यार्थ्यांसमोरच गुरूजींची हाणामारी

शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, गावकरीही आक्रमक

इंदापूर दि १७(प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची आपापसात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुभाष भिटे, उद्धव गरगडे आणि संजीवनी गरगडे अशी भांडणे करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. भिटे आणि संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी भिटे व संजीवनी गरगडे यांची काही क्षुल्लक कारणावरुन भांडण झाली. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द एक असा सामना झाला. यावेळी जोरदार हाणामारीही झाली.विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडला तसेच याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

GIF Advt

या प्रकारामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत.या शिक्षकांमध्ये वारंवार वादविवाद होतात, हाणामारी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पाल्यांना शाळेच्या अभ्यासक्रमातील काहीही येत नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी. नवीन शिक्षक येईपर्यंत आम्ही सर्व जण शाळा बंद करीत आहोत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!