पांगरी फटाका आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
या गोष्टीमुळे लागली आग, घटनेनंतर कारखाना मालक साथीदारासह फरार
बार्शी दि २(प्रतिनिधी)- बार्शीतील पांगरी-शिराळा फटका फॅक्टरी स्फोट प्रकरणात पोलीसांनी फॅक्टरीचा मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण मालक साथीदारासह फरार असल्याने पांगरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बार्शी तालुक्यातील पांगरी फटाका आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या फॅक्टरीत स्फोट झाला त्या कारखान्याला फटाके बनवण्याचा कोणताही परवाना देण्यात आला नव्हता अनधिकृतपणे त्या ठिकाणी फटाके बनवण्याचे काम करण्यात येत होते. शिवाय परवानगी दिलेली जागा सोडून दुसरीकडे कारखाना सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच बार्शीतील फटाके कारखान्यात आग लागून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता तर काही कामगार जखमी झाले होते. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, त्याचा आवाज काही किलोमीटर पर्यंत ऎकू गेला होता. तस कारखाना परिसरातील जेसीबीही जळुन खाक झाला होता. तर आजुनबाजुला वाळले गवत असल्यामुळे आग दोन किलोमीटरपर्यंत पसरली होती. एका महिलेचा मृतदेह तर स्फोटामुळे उडून शेतात पडला होता. तर अग्निशमन आणि रुग्णावाहिका लवकर उपलब्ध न झाल्यामुळे मोठी वित्त, आणि जीवितहानी झाली होती. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनाकडून घोषित करण्यात आली आहे. कारखान्यातील आगीच्या घटनांचे व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते भीषण आहेत.
पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करताना फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाला तिथल्या मजुरांच्या सुरक्षेची कुठलीही साधनं नसल्याचे निदर्शनास आहे आहे.शिवाय कामगार काम करत होते त्यांना त्या कामाबद्दल कुठलंही प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. कारखाना मालक युसुफ मणियार आणि साथीदार नाना पाटेकर दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.