Latest Marathi News

नवीन वर्षात अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

गाण्यातील लुक समोर अभिनेत्रीही फिक्या, मॉडर्न लुकमध्ये म्हणाल्या 'आज मैं मूड..'

मुंबई दि २(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. शिवाय त्या गायिकाही आहेत.त्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग आहे. तर आता गायिका म्हणून अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नवीन गाण्याची घोषणा केली आहे.

अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याचे बोल ‘आज मै मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’, असे असणार आहेत. ‘टी सीरिज’चं हे गाणं येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.त्यांचं हे गाणं बॅचलर्सवर आधारित असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता यांचा नवीन लूक पाहायला मिळत आहे. जीन्स, टॉप व जॅकेट परिधान करुन ज्वेलरी घालून हटके फॅशन केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. त्यांचा या लुकसमोर आघाडीच्या अभिनेत्री देखील फिक्या पडत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची गाण्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमृता यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचा हटके लुक लक्षवेधी ठरतोय.वेस्टर्न कपड्यांवर ट्रेंडी ज्वेलरी असा त्यांचा लुक आहे. अमृता फडणवीस यांची गाणी ही कायमच चर्चेचा विषय ठरत आलेली आहेत. अमृता फडणवीस यांचे नवीन वर्षातील हे पहिलेच गाणे आहे. त्यात त्यांचा हटके लुक असल्यामुळे त्यांच्या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असल्या तरीही त्यानी अनेक गाणी गायली आहेत.त्यांच्या गाण्याला लोकप्रियताही मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नदी संवर्धनासाठी गाणे गायले होते. त्या गाण्यात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांनी अभिनय देखील केला होता. त्यांच्या आवाजावर ट्रोल सुद्धा करण्यात आले आहे. पण त्यांनी आपण त्याकडे लक्ष देत नाही आपण गाणे गात राहणार अशी थेट प्रतिक्रिया अमृता यांनी दिली होती. आता त्यांच्या नव्या गाण्याला कसा प्रतिसाद भेटणार ते पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!