लग्न मंडपात नवरीने नवरदेवाला पाहताच लग्नाला दिला नकार
लग्नमंडपातील सावळ्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, मुलीने दिलेले कारण चकित करणारे, नेमके काय झाले?
पटना दि ९(प्रतिनिधी)- लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. अनेकजण या काळात भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. यावेळी आपला भावी जोडीदार कसा असावा याची आणखी देखील अनेकांनी केलेली असते. पण बिहार मध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये नवरा सावळा असल्याने एैन लग्नमंडपातच लग्नाला नकार दिला आहे.
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील कहालगावच्या रसालपूर भागात सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. विनोद मंडल यांची मुलगी किट्टू कुमारी हिचा विवाह धनौरा येथील रहिवासी डॉ. वीरेंद्र सिंह यांचा मुलगा नीलेश कुमार सिंग याच्याशी होणार होता. पण जेंव्हा नवरी मुलीने नवऱ्या मुलाला प्रत्यक्षात पाहिले, तेंव्हा नवरी मुलीचा प्रचंड अपेक्षाभंग झाला. आणि तिने मंडपातच लग्नाला नकार दिला. आणि रडू लागली. सर्वजण मुलीला लग्न न करण्याचे कारण विचारले असता, मुलीने यामागचे कारण सांगितले की, वराचे वय अधिक असून तो सावळ्या रंगाचा आहे. लग्नाआधी मला फक्त वराचा फोटो दाखवण्यात आला होता. पण फोटोत आणि प्रत्यक्षात खुप फरक असल्याचे कारण नवरी मुलीने दिले. घालण्यास आणि टिळक लावण्यास स्पष्ट नकार दिला. तिला मनवण्याचे प्रयत्न चालू राहिले पण वधू राजी झाली नाही. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांना बरेच काही सुनावले, परंतु तरीही वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मंचावर वधू किट्टू कुमारीने वराच्या गळ्यात हार घालण्यास आणि टिळक लावण्यास स्पष्ट नकार देत मंचावरून खाली उतरून ती तिच्या खोलीत गेली. त्यानंतर वर पक्षाला वधूशिवाय परतावे लागले आहे. मुलीने लग्नास नकार का दिला याचे कारण आम्हाला माहित नाही. तिने असे का केले हे प्रत्येकजण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशी प्रतिक्रिया नवरा मुलाचे वडील डॉ वीरेंद्र सिंग यांनी दिली आहे.
लग्न हा कोणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. म्हणूनच म्हणतात की लग्नाचा निर्णय खूप काळजीपूर्वक घेतला पाहिजे. दरम्यान लग्नात गोंधळ होण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.