
मुंबई दि ५ (प्रतिनिधी) – ‘धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीत जागा दाखवून द्या’ असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राजकारणात काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. असेही शहा म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिंदेनाही इशारा दिला आहे.
मुंबईच्या दाै-यावर आलेल्या अमित शहा यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शहा म्हणाले की, “तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला आहे. राजकारणात सगळे काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका, केवळ दोन जागांसाठी २०१४ साली शिवसेनेने युती तोडली, भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ असे म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंवर विश्वासघात केल्याचा आरोप केला.
मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे असल्याचे सांगत शहा यांनी ठाकरेच प्रमुख विरोधक असतील हे स्पष्ट केले. पण मुंबईवर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे म्हणत एकनाथ शिंदेंनाही इशारा दिला आहे.