Latest Marathi News
Ganesh J GIF

रामदास आठवलेंमुळे एकनाथ शिंदेंच्य अडचणी वाढणार?

आठवलेंमुळे शिंदे गटात अस्वस्थता, भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा, नक्की काय घडले

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे , त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फैरी झडत असताना आता महायुतीत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. पण त्याआधी रामदास आठवलेंमुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

रामदास आठवले यांच्या यांचे पक्षाचे २८ मेला शिर्डीत राज्य अधिवेशन पार पडणार आहे. रिपाई आठवले पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पहिले अधिवेशन हे शिर्डीत होत आहे. यंदा रामदास आठवले हे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापासूनच आठवले गटाकडून लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. पण यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण शिर्डी मतदारसंघातून मागच्या दोन्ही टर्ममध्ये सदाशिव लोखंडे खासदार झाले आहेत. मागच्या वर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण आता आठवलेंमुळे शिवसेना भाजपात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. रामदास आठवले यांनी २००९ साली शिर्डी लोकसभा निवडणूक लढली होती, पण शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता. त्यानंतर आठवले यांनी राज्यसभेला पसंती दिली होती. पण मोदींच्या लाटेचा फायदा घेण्याचा आठवलेंचा मानस आहे. पण त्यामुळे सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आठवले सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यसोबत युती होती. पण नंतर रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली आणि शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीमध्ये ते सहभागी झाले, यानंतर रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळालं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!