
तर मला आणि माझ्या मुलीच्या निधनाला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असता
भारताच्या स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीचा धक्कादायक दावा, सोशल मिडीयावरील 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली उमेश नावाच्या एका...
दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी सध्या जोरदार फार्मात आहे. विश्वचषकात त्याने आपल्या कामगिरीच्या बळावर गोल्डन बाॅल पुरस्कार जिंकला होता. त्याषबरोबर मोहम्मद शामी आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. त्यामुळे एकीकडे शमीच्या कौतुकाच्या पोस्ट चर्चेत असताना त्याची विभक्त पत्नी, हसीन जहाँच्या नावे अनेक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. आता बसून जहाॅंने एक पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे.
मोहम्मद शमी पैसे देऊन विकेट घेतो व फलंदाजांना आउट व्हायला सांगतो असा दावा हसीन जहाँने केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. तसेच हसीनच्या शमी किंवा क्रिकेट संघावर केलेले कोणतेही भाष्य कमालीचे व्हायरल होत असते. पण आता हसीनने सोशल मिडीयावर एक पोस्ट करत मोठा खुलासा केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, समाजात होणारे अपराध ज्या लोकांना माहिती आहेत आणि जे लोक होणारे अपराध समजतात. माझ्याबद्दल सर्व काही खोटं पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. समाजात मला बदमान करण्यासाठी कट रचण्यात आले आहेत. २०१८ मध्ये शमीने उमेश नावाच्या एका मीडिया माफियाला कामावर ठेवले होते. त्याच्याच मदतीने शमी माझी खोटी बदनामी करत आहे. मी शमीवर कोणताही असा खोटा आरोप लावलेला नाही किंवा कोणती तक्रारही केलेली नाही. शमी आणि त्याच्या कुटुंबाने माझ्यावर जसा अत्याचार केला होता त्याविषयीच मी फक्त तक्रार केली आणि तो प्रकार जगाच्या समोर आणला होता. कोर्टाने सुद्धा अजूनपर्यंत शमीला क्लीनचिट दिली नाही किंवा मला दोषी घोषित केलेलं नाही. पण विकलेल्या मीडियानेच न्यायाधीश बनून मला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हीच सांगा अशा गुन्हेगारांचं काय करायला हवं. शमी अहमद स्वतःचं पाप आणि गुन्हे लपवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. मी जर काही कारवाई केली नसती तर माझ्या आणि माझ्या मुलीच्या मृत्यूला पाच वर्षांहून अधिक काळ लोटला असता आणि तुमच्यापैकी कोणाला आमच्याबद्दल काहीच माहिती नसते. माध्यमांनी कधीही एक बाजू अन्यायकारकपणे मांडू नये; दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत.’ असे ती म्हणाली आहे. दरम्यान मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ कायम पतीवर गंभीर आरोप करताना दिसते. कारण शमीने देशासाठी चांगली कामगिरी केली तर तो चांगली कमाई करेल आणि तिला आणि त्यांची मुलगी आयरा यांना पुरवण्यास सक्षम असेल. मी टीम इंडियाला माझ्या शुभेच्छा देईन पण त्याला नाही असे ती म्हणाली होती.
हसीन कायम मोहम्मद शमी याच्याबद्दल वक्तव्य करत असल्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर कायम हसीन चर्चेत असते. विश्वचषकादरम्यान शमीसोबत त्याची पत्नी हसनीही चर्चेत होती. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांची पहिली ओळख २०१२ मध्ये झाली होती. कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांना एक मुलगी आहे.