Latest Marathi News
Ganesh J GIF

म्हणुन तरुणाने केली प्रेयसीच्या मुलाचे अपहरण

प्रियकर तरुणाचे कृत्य, पण पोलीसांनी शिताफिने ठोकल्या बेड्या

तुळजापूर दि ४ ( सतीश राठोड ) लॉकडाऊन काळात शेअर चॅटच्या माध्यमातून ओळख झालेल्या सोलापूरच्या प्रियसीच्या हौसेसाठी अमाप पैसा खर्च केला यात प्रियकर कर्जबाजारी झाला कर्ज फेडण्यास पैसे नसल्याने त्याने चक्क प्रियसीच्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करत दोन लाखाची खंडणी मागितली याप्रकरणी २४ तासात नळदुर्ग पोलिसांनी प्रियकर आरोपीसह दोघाना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , ३१ जानेवारी रोजी सोलापुरातील एक कुटुंब लग्न सोहळ्यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे आले होते यावेळी सात वर्षाचा मुलगा हरवल्याचे लक्षात आले . शोधूनही तो सापडला नाही . पीडित कुटुंबीयाने नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता नळदुर्ग पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी तपासाची चक्रे फिरवली . अन् दोन पोलीस पथके रवाना केली . अपहरणामागे प्रियकर किरण अविनाश लादे राहणार सारोळे तालुका मोहोळ अस या आरोपीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे .

किरण लादे याचे सोलापुरातील एका महिलेसोबत प्रेम संबंध होते .किरणने प्रियसी वर पैसे खर्च केल्यामुळे कर्जबाजारी झाला . कर्ज फेडण्यासाठी किरण अपहरणाचा डाव रचला व दोन लाख रुपये मागितले .
त्याने मुलाला त्याचे मित्राकडे रामनगर सांगली यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेतले व मुलाला आईच्या स्वाधीन केले किरण सह त्याचे दोन मित्रा वर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रियकर सह दोघाना 24 तासात नळदुर्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!