Latest Marathi News

भर रस्त्यात दोन मुलींची एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेटक-यांकडुन भन्नाट प्रतिक्रिया

नाशिक दि ४(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेकदा हाणामारीचे फ्री स्टाईल व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मिडीयावर नाशिकमधील दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात दोन तरूणी भिडल्या आहेत.

हाणामारीचा व्हिडिओ नाशिकमधील कोणत्या भागातील आहे याची माहिती मिळू शकली नाही पण व्हिडिओत दिसत आहे की, दोन शाळकरी मुली एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत,भर रस्त्यात या दोन तरुणी एकमेकांना जोरदार मारहाण करत आहे. त्या एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत. या मुलींचे भांङण बघायला अनेक लोकांनी गर्दी केली होती. याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि व्हायरल केला.मात्र या तरुणींमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान नाशिकला ही घटना काही नवीन नाही, यापूर्वी देखील अनेकदा शहरात असे प्रकार घडलेले आहेत.

 

कॉलेजच्या तरुणांमध्ये राडा झाल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, मुलींमध्ये झालेली ही हाणामारी सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. यापूर्वीही नाशिकच्या गंगापूर रोड येथील महाविद्यालयातील तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!